Saturday, February 15, 2025

अहमदनगर मधील वाळू तस्कर स्थानबद्ध, जिल्हादंडाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांचे आदेश

अहमदनगर : तालुक्यातील कोळपेवाडी येथील रहिवासी व सराईत गुन्हेगार, वाळू तस्कर योगेश संजय कोळपे (वय ३२) यास जिल्हादंडाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या आदेशाने स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याच्यावर कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गैर कायद्याची मंडळी जमवुन मारहाण करणे, दरोडा, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, शासनाची फसवणूक करुन गौणखनीजाचे उत्खनन करणे, सरकारी नोकरावर हल्ला करणे असे गुन्हे दाखल आहेत.

योगेश संजय कोळपे याने शासकीय वाळु चोरीचे गंभीर स्वरुपाचे व मारहाणीचे गुन्हे दाखल होते. त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील तसेच आजुबाजुच्या परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. सराईत गुन्हेगार व वाळू तस्कर योगेश कोळपे याचे समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिस निरीक्षक संदिप कोळी यांनी एमएपीडीए कायद्यान्वये प्रस्ताव तयार करुन शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी व श्रीरामपुर येथील अपर पोलिस अधीक्षक यांच्या मार्फत पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना पाठविला होता.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles