Sunday, July 14, 2024

अहमदनगर जिल्ह्यात शिक्षक निलंबित, मुख्य कार्यकारी यांनी काढले आदेश …

अहमदनगर-जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
गावातील अल्पवयीन विद्यार्थीनीस अश्लिल संदेश असलेली वही देणे, वर्गात धोकादायक हत्यार सापडणे,  पालकांशी तसेच सहशिक्षकांशी वाद घालणे, शालेय वेळेत मोबाईलवर गेम खेळणे इत्यादी प्रकारचे गैरवर्तन केल्याप्रकरणी खांडगाव जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकावर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतची समजलेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील खांडगाव जिल्हा परिषद शाळेत गणपत जानकू सुकटे हे कार्यरत असताना त्यांच्यावर विविध आरोप ठेवण्यात आलेले आहेत.यामध्ये वर्गात धोकादायक हत्यार सापडणे, पालकांशी तसेच सहशिक्षकांशी वाद घालणे, स्वतः चे वर्गात अश्लिल मजकूर असलेले भेटकार्ड वही प्राप्त होणे, इत्यादी प्रकारची तक्रार जिल्हा परिषदेपर्यंत पोहच झाली होती. याप्रकरणी प्रशासनाने आपल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी केली होती.त्या अहवालात सत्यता आढळल्याचे समजले आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी संबंधित उपाध्यापक शिक्षक सुकटे यांना निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत. तसेच त्यांना जामखेड पंचायत समिती हे मुख्यालय देण्यात आले आहे.
विद्यार्थीनीस अश्लिल संदेश असलेली वही देणे, वर्गात धोकादायक हत्यार.. शिक्षक निलंबित, अहमदनगरमधील घटना
अहमदनगर जिल्ह्यात शिक्षक निलंबित मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष यांनी काढले आदेश कारण ऐकून थक्क व्हाल

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles