Wednesday, April 17, 2024

नगर-पुणे महामार्गावर टायर फुटल्याने पिकअप झाला पलटी,२ लाखांच्या सफरचंदाचा चेंदामेंदा

मुंबईहून नगरला सफरचंद घेवून येणाऱ्या पिक अपचा टायर फुटल्याने पिक अप पलटी होऊन चालक गंभीर जखमी झाल्याची घटना नगर पुणे महामार्गावर कामरगाव (ता.नगर) घाटात सोमवारी (दि.२६) पहाटे घडली. या अपघातात सफरचंदाचे सर्व कॅरेट रस्त्यावर पडून सुमारे २ लाखांच्या पेक्षा जास्त सफरचंदाचे व पिकअप चे मोठे नुकसान झाले.

मुंबईहून सफरचंदाचे कॅरेट भरून एक पिकअप (क्र.एमएच २५ एजे ३३०७) नगरला येत होता. सोमवारी (दि.२६) पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान कामरगाव घाटात हा पिकअप आला असता त्याचा टायर फुटल्याने तो पलटी होऊन लांबपर्यंत घसरत गेला. त्यामुळे त्यातील सफरचंदाचे सर्व कॅरेट रस्त्यावर पडून सफरचंदाचा चेंदामेंदा होऊन नुकसान झाले. तर या दुर्घटनेत पिकअप चालक अनिकेत गोसावी (रा. करमाळा, सोलापूर) हा गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी नगरच्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती मिळाल्यावर या परिसरात मृत्युंजय दूत म्हणून काम करणारे सिद्धांत आंधळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला काढत वाहतूक सुरळीत करण्यात मदत केली. तसेच महामार्ग पोलिसांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles