Tuesday, December 5, 2023

अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे चित्र स्पष्ट

अहमदनगर-जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतीसाठी पुढील महिन्यांत 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अनेकांनी काल बुधवारी आपले अर्ज माघारी घेतले. त्यामुळे गावपातळीवर कोणामध्ये लढती रंगणार याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. माघारीनंतर उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. परिणामी आता प्रचाराला वेग येणार आहे.

जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाच्या 1 हजार 701 जागांसाठी 7 हजार 260 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. माघारीनंतर प्रत्यक्षात 3 हजार 995 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर सरपंच पदाच्या 194 जागांसाठी 1 हजार 311 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. माघारीनंतर 610 उमेदवार रिंगणात आहे. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पद तर काही ठिकाणी सरपंच पदाची जागा बिनविरोध झाल्या आहेत.

कोपरगाव 17 ग्रामपंचायत 405 (19) सदस्य आणि 48 (1) सरपंच, कर्जत 6 ग्रामपंचायत 111 (6) सदस्य आणि 18 (1) सरपंच, नगर 8 ग्रामपंचायत 180 (18) सदस्य आणि 19 (2) सरपंच, राहुरी 22 ग्रामपंचायत 528 (26) सदस्य आणि 68 (1) सरपंच, राहाता 12 ग्रामपंचायत 374 (10) सदस्य आणि 51 सरपंच, पारनेर 7 ग्रामपंचायत 144 (6) सदस्य आणि 22 (1) सरपंच, नेवासा 16 ग्रामपंचायत 262 (43) सदस्य आणि 50 सरपंच, पाथर्डी 15 ग्रामपंचाय 253 (7) सदस्य आणि 41 (1) सरंपच, श्रीगोंदा 10 ग्रामपंचायत 275 (7) सदस्य आणि 37 (1) सरपंच, जामखेड 3 ग्रामपंचायत 59 (1) सदस्य आणि 10 सरपंच, अकोला 27 ग्रामपंचायत 361 (114) सदस्य आणि 119 (6) सरपंच, संगमनेर 7 ग्रामपंचायत 132 (18) सदस्य आणि 13 (2) सरपंच, श्रीरामपूर 17 ग्रामपंचायत 338 (41) सदस्य आणि 36 (4) सरपंच, शेवगाव 27 ग्रामपंचायत 573 (13) सदस्य आणि 78 सरपंच, जामखेड 3 ग्रामपंचायत 59 (1) सदस्य आणि 10 सरपंच पदासाठी उमेदवार रिंगणात आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: