अहमदनगर कोपरगाव : तालुक्यातील रांजणगाव देशमुख ग्रामपंचायतीच्या सरपंच जिजाबाई गजानन मते यांना एकत्रित कुटुंबाचे अतिक्रमण असल्यामुळे अपात्र करण्याचा आदेश जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी पारित केला आहे. याबाबतचा आदेश बुधवारी प्राप्त झाला.
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव ग्रामपंचायतीच्या देशमुख सरपंच जिजाबाई गजानन मते यांचे व त्यांच्या 3 जागेवर कुटुंबीयांचे शासकीय व्यावसायिक अतिक्रमण असल्यामुळे त्यांना ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावरून अपात्र करावे म्हणून आशा गोर्डे व प्रकाश गोर्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विवाद अर्ज सादर
केला होता.
सदरील अर्जाची जिल्हाधिकाऱ्यांनी गुणवत्तेवर सुनावणी पूर्ण केली. सदरील प्रकरणांमध्ये गटविकास अधिकारी कोपरगाव तसेच बांधकाम विभाग यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला होता.सदरील सुनावणीदरम्यान अर्जदार व सरपंच या दोघांचा युक्तिवाद जिल्हाधिकारी यांनी ऐकून घेतल्यानंतर गुणवत्तेवर न्याय निर्णय पारित करून त्यामध्ये एकत्रित कुटुंबीयांचे सरकारी मिळकतीवर अतिक्रमण निष्पन्न झाले.त्यामुळे महिला सरपंच जिजाबाई गजानन मते यांना अपात्र करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी २१ डिसेंबरला दिला.सदरील अर्जदार आशा गोर्डे व प्रकाश गोर्डे यांच्यावतीने विधिज्ञ गोरक्ष पालवे यांनी काम पाहिले.