Wednesday, February 28, 2024

आयोध्यात प्रभु श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा,अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ म्हणाले…

नगर – आज आयोध्यात प्रभु श्रीरामचंद्रांचे मंदिर उभे राहून प्राणप्रतिष्ठा होत आहे, यानिमित्त देशभर मोठे उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येक श्रीराम भक्तांच्या घराघरात, गाव-शहरातील मंदिरांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक घटनेमुळे श्रीरामांच्या आगमनाने देशभरात शांती, सुखमय वातावरण निर्माण होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी व्यक्त केला.

आयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते आरती करण्यात आली. याप्रसंगी देवस्थान अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिन अशोकराव कानडे, विश्वस्त पांडूरंग नन्नवरे, विजय कोथिंबीरे, नितीन पुंड, संजय चाफे, ज्येष्ठ नेते सदा देवगावकर, प्रा.भानुदास बेरड, सचिन पारखी, बाळासाहेब गायकवाड, राजेंद्र एकाडे, ऋषीकेश आगरकर, गणेश राऊत आदि उपस्थित होते.

याप्रसंगी अ‍ॅड.अभय आगरकर म्हणाले, आज आयोध्यात प्रभु श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत आहे, या ऐतिहासिक घटनांचे आपण सर्वजण साक्षीदार झालो आहेत. 500 वर्षांचा वनवास आज संपला आहे. आयोध्येतील प्राणप्रतिष्ठापणमुळे देशभर मोठे चैतन्य निर्माण झाले आहे. हा सोहळा आज प्रत्येकजण दिवाळा सारखा साजरा करत आहेत. शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिराच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, शहरातील नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी होत आपला आनंद व्यक्त करत आहेत. आता खर्‍या अर्थाने रामराज्य निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला.

देवस्थानच्यावतीने आयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रेक्षपण नागरिकांना पाहण्यासाठी एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती. दिवसभर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिर परिसरात आकर्षक रांगोळी, गाभार्‍यात फुलांची आकर्षक सजावट, विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला होता. जय श्रीराम च्या घोषणेने परिसर दणानूण गेला होता.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles