Wednesday, April 17, 2024

अहमदनगरच्या नामांतराच्या ठरावाला कॅबिनेटमध्ये मंजुरी द्यावी, आ. संग्राम जगताप

नगर : अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे करण्याची मागणी जिल्ह्यातील अनेक मान्यवरांच्या वतीने तसेच सर्व धनगर समाज बांधव आणि सर्व संघटनांनी वेळोवेळी माझ्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून केलेली आहे, तरी उद्या होणाऱ्या राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत हा नामकरणाचा विषय घेवून मंजूर करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धनगर समाजाचे नेते आ. दत्ता भरणे यांनी निवेदनातून केली, यावेळी आ. संग्राम जगताप, आ. नितीन पवार, सुरेश बनसोडे आदी उपस्थित होते.
आ. दत्ता भरणे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य महान असून नगर जिल्ह्याला त्यांचा इतिहास लाभला आहे, अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करून लोकभावनेचा आदर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles