ग्रामपंचायत ची मिटिंग सुरू असताना अचानक पोलिस येतात अन थेट सरपंचालाच तुम्ही गावत काय करता तुम्हाला गाव बंदी आहे. असा सवाल करत मिटींग मधुन सरपंचास बाहेर काढले जाते.
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील ग्रामपंचायतचे सरपंच शरद पवार यांच्यावर 307 चा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यामुळे त्यांना गावात प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र उच्च न्यायालय संभाजी नगर (औरंगाबाद) यांच्या आदेशानुसार सरपंचांना ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंग अथवा इतर गावाच्या विकासाबाबत कामासाठी पूर्व परवानगीने गावात येण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार सरपंच पवार हे आज ग्रामपंचायत मिटिंग साठी गावात आले होते. तशी माहिती देखील त्यांनी पोलिसांना लेखी अर्जाद्वारे दिलेली होती. ठरल्याप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयात ही मिटींग सुरू होती. अन अचानक नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गीते हे थेट ग्रामपंचायत कार्यालयात सुरू असलेल्या मिटींग मध्ये जाऊन सरपंच शरद पवार यांना बाहेर आणले व तुम्हाला गाव बंदी आहे तुम्ही गावात कसे असा सवाल केला.सरपंच पवार यांनी गीते यांना सांगितले की मी रितसर आपल्या पोलीस स्टेशनला लेखी स्वरूपात अर्ज दिला आहे परंतु तुम्ही मला जाणून टार्गेट करत आहात.
दरम्यान हा नेमका काय प्रकार चालू आहे याबाबत ग्रामस्थ देखील अनभिज्ञ होते. मात्र नंतर सर्व प्रकार लक्ष्यात येताच ग्रामस्थांनी विचारणा करताच पोलिसांनी आपली भूमिका बदलली.
मात्र या प्रकारामुळे सरपंच शरद पवार यांनी सांगितले की,निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकारे बोगस कारवाईमध्ये गुंतवण्याचे काम चालू आहे.
जर असे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून असे षडयंत्र करत असाल तर आम्ही स्वस्त बसणार नाही. याबाबत आपण पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब,नाशिक परिक्षेत्रचे ig बी. जी. शेखर यांच्याकडे दाद मागणार आहोत आणि त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर न्यायालयात या पोलिसांविरुद्ध जाणार आहोत असे सांगितले . त्यामुळे नगर तालुका पोलिस आता याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
आता आरपारची लढाई
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने गावात तीव्र पाणी टंचाई आहे. तसेच अतिक्रमण, विकास कामाबाबत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत मिटींग आयोजित करण्यात आली होती.
ग्रामपंचायतची मासिक मीटिंग असल्याने माझी उपस्थिती गरजेची असल्याने उच्च न्यायालय संभाजी नगर(औरंगाबाद) यांच्या आदेशानुसार मी पोलिसांना लेखी अर्जाद्वारे याबाबत कल्पना दिली होती. तरीदेखील नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गीते यांनी जाणीवपूर्वक हा गोंधळ घातला. असा प्रकार पोलिसान कडू या अगोदर ही घडला आहे. त्यामुळे आता आपण याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत जाब विचारणार आहोत.
शरद पवार
सरपंच, चिचोंडी पाटील.