राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर भररस्त्यात गोळीबार करण्यात आला. त्यानंतर कोयत्याने सपासप वार करत त्यांची हत्या करण्यात आली. पुण्यातील नाना पेठ परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तातडीने तपासाची चक्रे फिरवत तिघांना अटक केली आहे
आदेश वनकर यांच्या हत्येचं धक्कादायक कारणंही समोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून निकटवर्तीयांनीच वनकर यांच्यावर गोळीबाद केला. कौटुंबिक वाद आणि पैशांच्या वादातून आरोपींनी त्यांची हत्या केली. सध्या पुणे पोलीस तिन्ही आरोपींची कसून चौकशी करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक होते. रविवारी संध्याकाळी (2 सप्टेंबर) साडेनऊ वाजेच्या सुमारास ते नाना पेठ परिसरात उभे होते. यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी आंदेकर यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर कोयत्याने सपासप वार करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.