Saturday, October 12, 2024

नगरमध्ये शिक्षक दांम्पत्याच्या मुलाचा अपघातात दुर्दैव मृत्यू,कल्याण रोड परिसरात हळहळ

अहमदनगर – नगर कल्याण रोडवरील हॅपी थॉट्स परिसर समता नगर येथील विद्यार्थी चिरंजीव अथर्व हरीश कुमार वेताळ इयत्ता सातवी मध्ये रेसिडेन्सीयल हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होता सोमवार दिनांक 1-10-2024 रोजी शाळा सुटल्यानंतर घरी येताना बालिकाश्रम रोडवर सर्वोदय कॉलनीत सायकलला अवजड वाहनाच्या धडकेत जागीच ठार झाला त्याच्या निधनाची बातमी समजल्यानंतर कल्याण रोड परिसरातील शिक्षक,नागरिक मोठ्या संख्येने सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपस्थित होते
त्याचे आई-वडील हरीश कुमार वेताळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदा ता. कर्जत येथे शिक्षक आहेत रात्री उशिरा नगरच्या अमरधामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या निधनाने कल्याण रोड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
यावेळी कल्याण रोडवर परिसरातील पारुनाथ ढोकळे यांनी दिल्ली गेट परिसर,सिद्धी बाग परिसर, नेप्ती नाका येथे वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक होणे गरजेचे आहे . तसेच शहरात अवजड वाहतूकीला बंदी असताना शहरात अवजड वाहने कशी येतात याचीही पोलीस प्रशासनाने चौकशी करावी. जेणेकरून पुढील अनर्थ टळतील अशी मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles