महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे केली आहे. दुष्काळाच्या मुकाबला करण्यासाठी आचारसंहितेचा अडसर निर्माण होतोय, असंही राज्य सरकारने म्हटलं आहे.
राज्य सरकारच्या या विनंतीवर निवडणूक आयोग आज निर्णय घेण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या अखेरीस राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणांनी तळ गाठल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
शहरासोबत ग्रामीण भागातील नागरिकांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच राज्यात सद्या आचारसंहिता लागू असल्याने दुष्काळी उपाययोजनांसाठी अडसर निर्माण होत आहे. हीच बाब लक्षात घेता राज्य सरकारने निवडणूक आयोगाला आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती केली आहे.
लोकसभा निवडणूक आचारसंहिता शिथील झाल्यास राज्य सरकारच्या दुष्काळी उपाययोजनांना गती मिळणार आहे. आज निवडणूक आयोगाकडून याबाबत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. लोकसभा निवडणुक आचारसंहिता शिथील झाल्यास राज्य सरकारच्या दुष्काळी उपाययोजनांना गती मिळणार आहे.