वाहतुकदार संघटनेने दिलेल्या संपाच्या इशाऱ्यामुळे नगर बाजारसमितीच्या नेप्ती उपबाजारातील कांदा लिलाव गुरुवारी (दि.११) बंदठेवण्याचा निर्णय दि अहमदनगर फळफळावळ व आडत्यांचे असोसिएशनने घेतला आहे. तसे पत्र त्यांनी बाजार समिती प्रशासनाला दिले असल्याने शेतकऱ्यांनीगुरुवारी आपला कांदा विक्रीसाठी नेप्ती उपबाजारात न आणण्याचे आवाहन करण्यात आलेआहे.
वाहतुकदारसंघटनेने दिलेल्या संपाच्या इशाऱ्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेलाशेतीमाल परराज्यात पाठविण्यासाठी वाहने उपलब्ध होणार नाहीत, म्हणून गुरुवारी (दि.११) कांदा लिलाव बंद ठेवण्याबाबतचे पत्र दि अहमदनगरफळफळावळ व आडत्यांचे असोसिएशनने सोमवारी (दि.८) बाजार समिती प्रशासनाला दिले आहे. या मागणीचा विचारकरून गुरुवारी होणारे कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनानेघेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गुरुवारी आपला कांदाविक्रीसाठी नेप्ती उपबाजारात आणू नये असे आवाहन सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ व सचिव अभय भिसे यांनी केले आहे.