चुकीला माफी नाही! शिक्षकाच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांनी एकमेकांना लगावली सणसणीत..व्हिडीओ

0
20

सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ शाळेशी संबंधित असतात. ज्यामध्ये शाळेतील अनेक गंमती जमती आपणाला पाहायला मिळतात. असे व्हिडीओ पाहून आपल्यालाही बालपणीचे दिवस आठवतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला तुमच्या शाळेतील दिवस आठवतील.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दोन विद्यार्थ्यांना शिक्षकांनी एकमेकांना शिक्षा करायला लावल्याचं पाहायला मिळत आहे. हे दोघे एकमेकांना ज्याप्रमाणे शिक्षा करत आहेत ते पाहून तुम्हालाही हसू आवरणं कठीण होईल यात शंका नाही. हा व्हिडीओ एका वर्गातील असून व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, वर्गात अनेक विद्यार्थी आहेत. यातील दोघांना शिक्षकांनी उभं केलं आहे. त्यांनी वर्गात दंगा केल्यामुळे किंवा एकमेकांशी भांडल्यामुळे शिक्षकांनी त्यांना शिक्षा केली असावी असा अंदाज लावला जात आहे