अहमदनगर-श्रीगोंदा : जलसंपदा विभाग कुकडी प्रकल्पातील श्रीगोंदा विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अधिकारी किरणकुमार देशमुख यांचे निलंबन तेरा दिवसांत शासनाने रद्द केले. देशमुख यांना नाशिक येथील कालवा संकल्पचित्र विभाग क्रमांक दोनमध्ये कार्यकारी अभियंतापदी नियुक्ती देण्यात आली. याबाबतचे लेखी आदेश जलसंपदा विभागाचे सहायक सचिव डॉ. सुदिन गायकवाड यांनी काढले आहेत. सीना तलावातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याच्या कारणावरून कुकडी प्रकल्पातील कार्यकारी अभियंता किरणकुमार देशमुख यांच्याबाबत आमदार प्रा. राम शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नाराजी
व्यक्त केली होती. त्यानंतर
जिल्हा प्रशासनाने त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाला पाठविला होता. जलसंपदा विभागाने किरण देशमुख यांच्या निलंबनाचे आदेश २३ फेब्रुवारीला
काढले होते.देशमुख यांची या प्रकरणी गंभीर चूक अथवा हलगर्जीपणा दिसत नाही, असे म्हणत त्यामुळे त्यांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. ६ मार्चला त्यांचे निलंबन रद्द करून नाशिक येथील कालवा संकल्पचित्र विभाग क्रमांक दोनमध्ये कार्यकारी अभियंतापदी नियुक्ती देण्यात आली.
अहमदनगर जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंत्याच निलंबन अखेर रद्द
- Advertisement -