सोशल मीडियावर कायमच अनेक प्रकारच्या घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ हे शिक्षक आणि विद्यार्थांचे असतात. कधी हे व्हिडिओ विद्यार्थांनी शिक्षकाला मारल्याचे असतात तर कधी शिक्षकाने विद्यार्थांला देलेल्या शिक्षेचे असतात. परंतू सध्या सोशल मिडियावर शिक्षक आणि विद्यार्थांच्या अनोख्या जुगलबंदीचा व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यामध्ये काही विद्यार्थीं आपल्या शिक्षेकेसोबत व्हायरल गाण्यावर डान्स करत आहेत
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपल्याला दिसते की, व्हिडिओच्या सुरूवातीला वर्गाबाहेर एक महिला शिक्षक आणि त्याच्यापाठी ४ विद्यार्थींनी उभ्या आहेत. विद्यार्थींनी शाळेतील गणवेशात आहेत तर शिक्षिकेने साडी परिधान केलेली आहे.
त्यानंतर रिल्स व्हिडिओ बनवण्यासाठी गाण्यावर डान्स करू लागतात. त्यांचा डान्स आणि एक्सप्रेशन पाहून लोक त्यांचे कौतुक करत आहेत. डान्स करताना सर्वांचा ताळमेळ उत्तम बसलेला आहे.