Wednesday, April 30, 2025

माध्यमिक शिक्षक संघटनेच्या दोन्ही गटांचे मनोमिलन , गट-तट विसरणार !

अहमदनगर (प्रतिनिधी)- सरकारी-निमसरकारी जिल्हा परिषद शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जुनी पेन्शन, शाळांचे साखगीकरण व कंपनीकरण रद्द करण्यासह इतर मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या 14 डिसेंबरच्या संपात एकजुटीने सहभागी होण्याचा निर्णय अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. नुकतीच दोन गटातील पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन एकजुट दाखवून न्याय, हक्काच्या मागण्यांसाठी संपात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला. या बैठकीतून दोन्ही गटांचे मनोमिलन होऊन यापुढे संघटना एकजुट ठेवण्याचा संकल्प करण्यात आला.
मागील संप स्थगित करताना दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता सहा महिने उलटून देखील राज्य सरकारने केलेली नसल्याने राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुन्हा संपाची हाक दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर 14 डिसेंबर पासून बेमुदत संप केला जाणार आहे. त्याच्या नियोजनार्थ जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी माध्यमिक शिक्षक भवन येथे सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, सचिव रमजान हवलदार, कार्याध्यक्ष राजेंद्र खेडकर, जिल्हा संघटक शिरीष टेकाडे, उपाध्यक्ष प्रशांत होन, भास्करराव कानवडे, संभाजी गाडे, सुदाम दळवी, राजेंद्र कोहकडे, मिलिंद औटी, संजय देशमाने, सोमनाथ सुंबे, बाळकृष्ण चोपडे, बाळासाहेब पाचारणे, सहसचिव रावसाहेब शेळके, प्रमोद तोरणे, भाऊसाहेब जीवडे, अरुण बोरनरे, दादासाहेब देशमुख, बाळासाहेब थोरात, आत्माराम दहिफळे, वाल्मीक रौंदाळे, खजिनदार अशोक सोनवणे, बाळासाहेब निवडुंगे, भरत लहाने, भालचंद्र देशमुख, रावसाहेब चौधरी, अविनाश नेहुल, दत्ता जाधव आदी उपस्थित होते.
या पुढील काळात माध्यमिक शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी एकत्र येऊन कामकाज करण्याचा ठराव घेतला. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी याला मंजूरी देऊन निर्णयाचे स्वागत केले. गट-तट विसरुन माध्यमिक शिक्षक संघटना होणाऱ्या संपात पूर्ण ताकतीने उतरणार आहे. तर संप यशस्वी करण्यासाठी तालुकास्तरावर घेण्यात येणाऱ्या बैठकीचे नियोजन यावेळी करण्यात आले. प्रत्येक तालुकास्तरावर संपाच्या पार्श्‍वभूमीवर बैठका घेऊन जागृती करण्याचे ठरविण्यात आले. तर संघटना एकीकरणासाठी माजी अध्यक्ष शिवाजी ढाळे, चांगदेव कडू तसेच माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन संघटना एकत्र ठेवण्यासाठी सर्वांनी एकजुटीचा संदेश दिला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles