Thursday, May 22, 2025

नगर जिल्ह्यातील ग्रामसेविकेची सतर्कता… नगर तालुक्यातील पाच जणांविरोधात केला गून्हा दाखल

अहमदनगर-आई – वडिलांसह चौघांनी अल्पवयीन मुलीला शिवीगाळ, मारहाण करून तिचा बळजबरीने विवाह लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीचे वय १५ वर्ष ११ महिने असून, ती नेवासे तालुक्यातील एका गावात राहणारी आहे. याप्रकरणी मुलीच्या आई-वडिलांसहपाच जणांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.आहे.

याप्रकरणी कापुरवाडी (ता. नगर) येथील ग्रामसेवक सारीका प्रकाश डोळसे (वय ३९रा. पाईपलाइन रस्ता, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. पीडित मुलीच्या आई, वडिलांसह तीन नातेवाईक अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप पोलिसांनी कोणालाही अटककेलेली नाही. मुलगी अल्पवयीन असूनही तिच्या आई, वडिल व इतरांनी तिला शिवीगाळ, मारहाण करून तिच्या इच्छेविरुध्द ३० जून रोजी कापुरवाडी येथे तिचा विवाह लावून दिला.

ग्रामसेवक सारीका डोळसे यांना याची माहिती मिळताच त्यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या आई, वडिल व मुलासह त्याच्या आई व वडिलांविरूध्द फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. अधिक तपास अंमलदार नगरे करत आहे. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत अल्पवयीन मुलीच्या विवाहाचे प्रकार रोखण्यासाठी सामाजिक संस्थांनी प्रयत्न केल्याने असे प्रकार कमी झाले आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles