राज्यातील गावगाड्यातला महत्वाचा घटक असलेला पोलीस पाटलांना खुशखबर आहे राज्यातील पोलीस पाटलांचं रखडलेलं मानधन देण्यासाठी 156 कोटी 24 लाखांचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक गृह विभागाने काल जारी केले. या निर्णयामुळे नगर जिल्ह्यासह राज्यातील पोलीस पाटलांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील पोलीस पाटलांचे मे ते ऑगस्ट 2024 या चार महिन्यांचे मानधन रखडलेलं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
त्यामुळे राज्यातील गावगाड्यातला महत्वाचा घटक असलेला पोलीस पाटील चार महिन्यांपासून ‘बिन पगारी, फुल अधिकारी’ बोलण्याची वेळ पोलीस पाटलांवर आली होती. पण आता हे मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.