अहमदनगर -तू माझ्यासोबत लग्न कर नाहीतर जीवाचे बरे वाईट करून घेत तुझे नाव घेईन, अशी धमकी एका तरुणांना फोनवरून सतरा वर्षीय मुलीला दिल्याचे घटना मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पीयुष सुंकी ( पूर्ण नाव माहित नाही राहणार दातरंगे मळा नगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे याबाबत मुलीने फिर्यादी दिली फिर्यादी मुलीचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून ती खाजगी शिकवणी घेते तिची काही दिवसापूर्वी संके याच्याशी ओळख झाली त्याचे पर्यावसन मैत्रीत झाले ते दोघे एकमेकांशी बोलत होते त्यानंतर दोन महिन्यांनी तू माझ्यासोबत प्रेम संबंध ठेव असे तो म्हणाला. केव्हापासून तो त्रास देत होता पोलिसांनी समज दिल्याने त्याने पुढील काही दिवस त्रास देणे थांबवले होते मंगळवारी फिर्यादी मुलगी मेडिकल मध्ये औषधे आणण्यासाठी गेली असता सुंकी तिला दिसला त्यामुळे ती तिथून घाई घाईने घरी निघून आली घरी पोहोचल्यानंतर संकेत याने कॉल कर नाहीतर बघ मग असा मेसेज पाठवला त्यामुळे मुलीने त्याला फोन केला व मला त्रास देऊ नको असे सांगितले त्यावर त्याने तू माझ्यासोबत लग्न कर नाहीतर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेऊन तुझे नाव घेईल, अशी धमकी दिली
लग्न कर नाहीतर जीवाचे बरे वाईट करीन तरुणांन दिली मुलीला धमकी! नगर शहरातील घटना..
- Advertisement -