Friday, March 28, 2025

अहमदनगर ब्रेकिंग: नगर शहरातील नामांकित हॉटेलमध्ये घडला धक्कादायक प्रकार

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील तारकपूर परिसरातील सिंग रेसिडेन्सी हॉटेलच्या रूममध्ये तरूण मृत अवस्थेत आढळून आला. प्रकाश जयकिसन जाकोटिया (वय ३७, रा. रेणुकानगर, आंबेजोगाई रस्ता, जि. लातुर) असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान त्याचा मृत्यू कशामुळे झाला याबाबतची माहिती वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर समजेल असे पोलिसांनी सांगितले.

प्रकाश जकोटिया हॉटेलच्या रूममध्ये बेशुध्द अवस्थेत असल्याची माहिती मॅनेजर थॉमस अरूण फर्नांडिस (वय ३६, रा. विजयनगर चौक, भिंगार) यांनी बुधवारी (दि. २९) रात्री तोफखाना पोलिसांना दिली.

पोलीस अंमलदार आर. ए. बारगजे यांनी हॉटेलमध्ये जाऊन खासगी रूग्णवाहिकेतून जकोटिया यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. जकोटिया हे नगरमध्ये कशासाठी आले होते. त्यांचा हॉटेलमध्ये मृत्यू कोणत्या कारणातून झाला याबाबत पोलीस तपास करत आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार सुनील आंधळे करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles