देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काल समोर आले आहेत. चार पैकी तीन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजपमध्ये स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. या विजयामुळे काँग्रेस पुन्हा एकदा पिछाडीवर गेली आहे.
चार राज्यांच्या निवडणूक निकालांनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या या मोठ्या विजयानंतर काँग्रेस आमदारांचा मोठा गट भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. शिवसेना, राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्ये मोठ्या फुटीचा अंदाज वर्तवला जात आहे देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही दिवसांपूर्वी काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे येत्या काळात राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.