Saturday, December 7, 2024

नगरमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेले अन चोरट्यांनी घर फोडले,तब्बल २० तोळे सोन्याचे दागिने व अडीच लाखांची रोकड

घराला कुलूप लावून कुटुंबासह नातेवाईकांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमा साठी मंगल कार्यालयात गेलेल्या किराणा व्यापाऱ्याचे घर चोरट्यांनी फोडून घरातील लोखंडी तिजोरीत ठेवलेले तब्बल २० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि २ लाख ५० हजारांची रोकड असा लाखोंचा ऐवज तिजोरी सह चोरून नेल्याची घटना नगर एमआयडीसी परिसरातील जिमखाना जवळील माताजी नगर येथे शनिवारी (दि.३०) रात्री ८ ते ११.५५ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत सुजय सुनिल गांधी (वय ३३, रा. माताजी नगर, जिमखाना, एमआयडीसी) एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यांच्या नातेवाईकाचे लग्न असल्याने दि. २८ पासुन ते दि. ३१पर्यंत नगर शहरातील केशर गुलाब मंगल कार्यलयात विविध कार्यक्रम होते. शनिवारी (दि.३०) रात्री साखरपुडा असल्याने गांधी कुटुंबीय रात्री ८ चे सुमारास घराला कुलूप लावून केशर गुलाब मंगल कार्यालय येथे गेले होते. तेथून कार्यक्रम आटोपून सर्वजण रात्री ११.५५ वाजण्याच्या सुमारास घरी आले असता त्यांना घराचे गेट उघडे दिसले.

त्यानंतर त्यांनी आत मध्ये जावून पाहीले असता घराचे मुख्य दरवाजाला लावलेले कुलुप तोडलेले दिसले व दरवाजाला कडी लावलेली दिसली, त्यानंतर कड़ी उघडून आतमध्ये प्रवेश करुन हॉल मधील शोकेशचे कप्प्यामध्ये ठेवलेली लोखंडी तिजोरी पाहीली असता ती तेथे दिसली नाही. त्यानंतर घरातील इतर रुम पाहिल्या असता तेथे देखील सामानाची उचकापाचक केल्याचे दिसुन आले. चोरट्यांनी नेलेल्या तिजोरीत तब्बल २० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि २ लाख ५० हजारांची रोकड असा ऐवज होता असे गांधी यांनी या फिर्यादीत म्हंटले आहे.

चोरीची घटना लक्षात आल्यावर गांधी यांनी एमआयडीसी पोलिसांना फोन करून माहिती दिली. ही माहिती मिळताच रात्र गस्तीवरील पथकाने घटनास्थळी येवून पाहणी केली. श्वान पथक आणि ठसे तज्ञ यांच्या पथकानेही घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, उपनिरीक्षक पाठक यांनी ही पथकासह जावून घटनास्थळी भेट देत चोरट्यांच्या शोधासाठी पथकाला सूचना दिल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles