Threads App मेटाच्या मालकीच्या इन्स्टाग्रामनेच थ्रेड्स हे नवे अॅप आता रिलीज केले असून ट्वीटरला स्पर्धा देण्यासाठी हे अॅप आले आहे. विशेष म्हणजे या अॅपने काही तासांतच तुफान डाऊनलोड्स मिळवत सर्वकालीन उच्च डाउनलोड प्राप्त केले आहेत. थ्रेड अॅप iOS आणि Android प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. म्हणजेच ते अॅपल अॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकते. याशिवाय, वापरकर्ते डेस्कटॉपवर साइटवरून थ्रेड वापरण्यास सक्षम असतील. थ्रेड अॅप सर्वात वेगाने डाऊनलोड होणारे अॅप बनले आहे. थ्रेड अॅप आतापर्यंत ५० दशलक्षाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे. हे अॅप लाँच झाल्यानंतर काही तासांतच एक कोटीहून अधिक वेळा डाऊनलोड झाले आहे. थ्रेड्स अॅपच्या येण्याने मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्वीटरचे टेन्शन सर्वाधिक वाढले आहे. कारण थ्रेड्स अॅपला ट्वीटरच्या स्पर्धेतच उतरवण्यात आले आहे.
Maruti Suzuki Invicto बाजारपेठेत सादर.. २५ हजार रुपयांमध्ये बुक करू शकता