अवैधरित्या कब्जात तलवार बाळगुन दहशत करणारे 3 इसम ताब्यात.
स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, लोकसभा निवडणुक सन 2024 निकालाचे अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातुन अवैध अग्नीशस्त्रे, घातक हत्यारे वापर, वाहतुक, विक्री व बाळगणे या सारख्या गैरप्रकारांना प्रतिबंध होणे करीता मा.श्री. दत्तात्रय कराळे साहेब, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी विशेष मोहिम राबविणे बाबत आदेशित केले आहे.
नमुद आदेशान्वये मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना तसेच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना अवैध शस्त्रे बाळगणा-या इसमांची माहिती घेवुन आवश्यक कारवाई करणे सुचना दिल्याने पोनि/श्री. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार राजेंद्र वाघ, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय गव्हाणे, विशाल दळवी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, संतोष लोढे, सचिन अडबल, संदीप चव्हाण, रणजीत जाधव, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ व उमाकांत गावडे अशा अंमलदारांची 3 वेगवेगळी पथके नेमली होती. सदर तिन्ही पथकांनी विशेष मोहिमे दरम्यान दिनांक 11/06/24 रोजी जिल्ह्यातील 3 इसमांविरुध्द कारवाई करुन त्यांचे कब्जातुन 16,000/- रुपये किंमतीच्या 03 तलवारी मिळुन आल्याने त्या जप्त करुन आरोपी विरुध्द खालील प्रमाणे 3 गुन्हे दाखल केले आहेत.