Saturday, April 27, 2024

शेवगाव दहावीच्या परिक्षा केंद्रावर धुडगुस घालणाऱ्या तिघांना केले जेरबंद, 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे भगवान विद्यालयातीलत दहावीचा शेवटचा भूगोल विषयाचा पेपर होता पोलीस बंदोबस्त नसल्याने परिसरातील युवकांनी थेट परीक्षा केंद्रावर धिंगाणा घातला भगवान विद्यालयातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर धिंगाणा घालणाऱ्या २१ जणांविरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सविस्तर माहिती अशी की शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील भगवानबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवार दिनांक 26 मार्च रोजी भुगोल या विषयाचा इयत्ता 10 वीचा पेपर होता. सदर शाळेवर दहावीचा भुगोल या विषयाचा पेपर चालु होता. शाळेच्या गेटला कुलुप लावलेले असतांना काही युवकांनी कुलुप तोडुन आतमध्ये प्रवेश करुन 15 ते 18 इसम यांनी परिक्षा केंद्रात शिक्षकांना व शिक्षिकेंना त्रास होवुन धाक निर्माण होईल असे वर्तन व कृती करुन हातातील लाकडी काठ्याचा धाक दाखवुन धक्काबुक्की करुन धमकी दिली. व शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणुन परीक्षा केंद्र संचालक यांचे फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात गु.र.नं.262/2024 भादवि कलम -353, 452, 332, 143, 146, 147, 148, 149, 504, 506 प्रमाने बुधवार दिनांक 27 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
शेवगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी तात्काळ आरोपींना अटक करण्यासाठी पथक तयार करुन सदर गुन्ह्यातील आरोपी नामे 1) ज्ञानेश्वर जनार्धन रक्टे रा.मुंगी, 2) दिपक अंकुश सपकाळ रा.बालमटाकळी, 3) अभिषेक भगवान गरड रा.बालमटाकळी ता.शेवगाव जि.अहमदनगर यांना गुन्हे दाखल होताच त्यांचा शेाध घेवुन बुधवार दिनांक 27 मार्च रोजी अटक केली. इतर आरोपी शेवगाव पोलीस शोध घेत आहे सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस .निरीक्षक दिगंबर भदाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माळी, पोहेकॉ परशुराम नाकाडे, पोहेकाँ सुधाकर दराडे, पोना उमेश गायकवाड, पोकॉ शाम गुंजाळ, पोकॉ बाप्पासाहेब धाकतोडे, पोकॉ संतोष वाघ, पोकॉ कृष्णा मोरे यांनी केली असुन पुढील तपास सपोनि महेश माळी हे करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles