Tuesday, June 25, 2024

पारनेर तालुक्यात दोन गटांत तुफान राडा,कारण आले समोर….

अहमदनगर पारनेर -सुपा येथील एमआयडीसीमध्ये नेहमीच दोन गटात वाद होतांना दिसत आहेत. आताही एमआयडीसीतील कॉट्रॅक्टवरुन दोन गटांत तुफान राडा झाला आहे.औद्योगिक वसाहतीमधील वाहत्ूाकीच्या कॉट्रॅक्टवरून दोन गटांमध्ये नगर-पुणे महामार्गावर तुफान राडा झाला. हाणामारी तसेच दगडफेक करीत दोन गट एकमेकांना भिडल्याचे पहावयास मिळाले. सुपा पोलीसांच्या हस्तक्षेपानंतर हा प्रकार थांबला.
विस्तारीत एमआयडीसीमध्ये उभारण्यात आलेल्या एका कंपनीच्या ट्रान्सपोर्टचे कॉक्ट्रॅक्टर परीसरातील काही तरूणांकडे गेल्या चार वर्षांपासून आहे. या तरूणांनी या कॉक्ट्रॅक्टवरचा हक्क सोडावा यासाठी सुरू असलेल्या चर्चेतुन वादाची ठिगणी पडली आणि त्याचे रुपांतर भांडणात झाले.

एमआयडीसील लगतच्या नगर-पुणे महामार्गावर दोन्ही गट एकमेकांना भिडले. तुफान राडा सुरू झाल्याने परिसरामध्ये तब्बल एक तास तणावाचे वातावरण होते. तालुक्याबाहेरील तरुण या राड्यात सहभागी झाले होते. या घटनेची माहीती सुपा पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना पांगविल्या. त्यानंतर हा राडा थांबला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles