वाघोबाची गावात रॉयल एन्ट्री, घराच्या भिंतीवर झोपला, गावकऱ्यांची घाबरगुंडी थरारक Video

0
22

मानवाने जंगले तोडून मोठमोठ्या इमारती, अपार्टमेंट उभारण्यास सुरूवात केली अन् वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले. मनुष्याच्या या आक्रमणानंतर नाईलाजाने वन्यजीवांनी शहरांकडे, गावांकडे मोर्चा वळवत मानवी वस्त्यांमध्ये शिरकाव केला. शहरात, गावात बिबट्या, वाघाचे दर्शन झाल्याच्या अनेक बातम्या ऐकायला मिळतात. अनेकदा हे प्राणी हल्लाही चढवतात. सोशल मीडियावर सध्या अशाच एका बाघोबाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
सोमवारी संध्याकाळी (२५, डिसेंबर) उत्तर प्रदेशच्या पिलीभीत व्याघ्र प्रकल्पातून एक वाघ थेट शेजारच्या गावाकडे आला. मध्यरात्री हा वाघ थेट गावात शिरला अन् भितींवर चढून बसला. सकाळी उठून हा प्रकार पाहिल्यानंतर गावकरीही भयभीत झाले. गावात वाघ आल्याचे समजताच सर्वांची घाबरगुंडी उडाली. या वाघाला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी तुफान गर्दी केली.

विशेष म्हणजे हा वाघ जाण्याची गावकरी वाट पाहत होते. त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र वाघ काही जागचा हालेना. गावकरी अन् वाघांच्या या थरारक भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.