video: वाघाचा थरार! जबड्यात पकडलं जिंवत हरणाचं पिल्लू अन्…

0
29

प्राणीसंग्रहालयांमधल्या प्राण्यांचे चित्रविचित्र, कधी धक्कादायक, विनोदी व्हिडीओज सतत व्हायरल होत असतात. त्यांचा मनसोक्त आनंदसुद्धा लोक घेतात. पण, काही व्हिडीओज खरंच विचारात पाडतात आणि निसर्गाच्या आश्चर्यांवर विचार करायला लावतात.

अनेकदा सोशल मीडियावर जंगलात राहणाऱ्या धोकादायक प्राण्यांचे विविध प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. जर तुम्हाला वन्यजीवांमध्ये रस असेल तर तुम्हाला हे व्हिडीओ नक्कीच आवडतील. प्राणी जग अद्वितीय आहे आणि कधीकधी आपल्याला आश्चर्यचकित करते. उत्तराखंडमधील लोकप्रिय जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये असेच दृश्य पाहायला मिळाले. जंगलातील शिकारी प्राणी नेहमीच शिकारीसाठी तयार असतात. ते कुठे, कधी आणि कसा हल्ला करतील याचा काही नेम नाही. विशेषतः वाघ, सिंह आणि बिबट्यासारखे प्राणी तर आपली शिकार हातातून जाऊच देत नाहीत. ते यामध्ये पटाईत असतात आणि अत्यंत कुशलतेनं दुसऱ्या प्राण्याची शिकार करतात.