सोशल मीडिया हे असे अनोखे जग आहे, जिथे कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल कोणीही सांगू शकत नाही. रोज आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघायला मिळतात. यात कोणीतरी जुगाड करत दुचाकीला ट्रॅक्टरचे चाक जोडताना दिसते, तर प्रसिद्ध होण्यासाठी कोणीतरी ट्रेन आणि मेट्रोमध्ये विचित्र गोष्टी करताना आढळतो. पण यावेळी व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती लोकांना स्टार्टअपची कल्पना देताना दिसत आहे. तुम्ही या स्टार्टअपसाठी किती खर्च येईल आणि त्या बदल्यात तुम्हाला किती कमाई कराल हे ती व्यक्ती संपूर्ण तपशीलवार सांगतोय.
व्हिडिओमध्ये तो व्यक्ती सांगतोय की, तुम्हाला ट्रेनमध्ये तिखट चना डाळ विकायला सुरुवात करावी लागेल. यावेळी तो बिझनेसची संपूर्ण माहिती देत म्हणतो की, ‘१३०० रुपये खर्च करून तुम्हाला तिखट चणा डाळ, टोमॅटो, कांदा, लिंबू आणि डिस्पोजेबल प्लेट्स विकत घ्याव्या लागतील. आता तुम्ही दिवसाला २०० प्लेट्स १५ रुपये प्रति प्लेटने विकल्यास तुम्हाला १७०० रुपये नफा मिळेल. अशा प्रकारे तुम्ही एका महिन्यात ५१ हजार रुपये आणि वर्षभरात ६ लाख १२ हजार रुपये कमवू शकता. तो पुढे सांगत की, तुम्ही सणासुदीच्या दिवशी काम केले नाही तरीही तुम्ही वर्षभरात ५ लाख रुपये कमवू शकता.
हा व्हायरल व्हिडिओ पाहून लोक आता विविध मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका यूजरने, पण चालत्या ट्रेनमधून उडी मारून दुसऱ्या ट्रेनमध्ये चढायला तुम्हाला कोण शिकवेल?असा मेजेशीर सवाल केला आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिलेय की, मी चहा विकेन. याशिवाय तिसऱ्या युजरने लिहिले की, मी हा बिझनेस सुरु करण्यास तयार आहे, फक्त ते विकण्यासाठी १५ २० कर्मचारी हवे आहे
Startup ….
😂😂😂😂 pic.twitter.com/O9ZE9wd2w0— HasnaZarooriHai🇮🇳 (@HasnaZaruriHai) October 18, 2023