Sunday, September 15, 2024

नगर शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव, आयुक्त यशवंत डांगे जनजागृतीसाठी नागरिकांच्या घरोघरी

डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची नालेगाव भागात जनजागृती

उपाययोजनांची आयुक्त यशवंत डांगे यांनी केली पाहणी

अहमदनगर : पावसाळ्यात उद्भवणारे विषाणूजन्य आजार रोखण्यासाठी दर रविवारी एक तास स्वच्छतेसाठी असे आवाहन महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले होते. त्यास अहमदनगर शहर व उपनगरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.या मोहीमेच्या तिसऱ्या रविवारी महानगरपालिकेच्या वतीने नालेगाव परिसरात झिका, डेंग्यू आदी विषाणूजन्य आजारांना रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात आली.

या मोहिमेत आयुक्त यशवंत डांगे यांनी स्वतः सहभागी होऊन नागरिकांना डास उत्पत्ती करणारी स्थाने नष्ट करण्याचे आवाहन केले. घर परिसराजवळ कोणत्याही ठिकाणी साचलेले पाणी वाहते करून द्यावे, फ्रिजचे ट्रे, कुंड्या, पक्षांसाठी ठेवलेले पाण्याचे भांडे, जुने टायर, भंगार वस्तू यामध्ये साचलेल्या पाण्यात एडीस डासांची उत्पत्ती होऊन विषाणूजन्य आजार पसरतात. त्यामुळे सदरचे पाणी तात्काळ वाहते करावे, संतुलित आहार घ्यावा, लहान मुलांना पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत, झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.या वेळी मनपा स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे, विकास गीते, सतीश ताठे आदिसह महात्मा फुले आरोग्य केंद्राचे डॉक्टर कर्मचारी अंगणवाडी, आशा सेविका उपस्थित होत्या.

जनजागृती मोहिमेदरम्यान स्थायी समितीचे माजी सभापती गणेश कवडे म्हणाले की, पावसाळ्यात अनेक विषाणूजन्य आजार पसरत असतात. ताप येणे, थंडी वाजून येणे, अंगदुखी, डेंग्यू आदी आजारांना रोखण्यासाठी महापालिका प्रशासन आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपायोजना करीत आहे. औषध व धूर फवारणीचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी नागरिकांचे सहकार्य देखील अपेक्षित असून त्यांनीदेखील प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन यावेळी केले.

अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात डेंगू मुक्त शहर अभियानानिमित्त जनजागृती मोहीम सुरू केले आहे. यानिमित्त कर्मचारी नागरिकांच्या घरोघरी जाऊन माहिती देत तपासणी करत आहे. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त यशवंत डांगे भर सकाळी नगर शहरामध्ये स्वच्छतेची माहिती घेत कर्मचाऱ्यांबरोबर डेंगू संदर्भात जनजागृती करत आहे. तसेच पाण्याचे साठे असलेल्या जागेची पाहणी करत आहे. व नागरिकांना माहिती देत संसर्गजन्य आजारापासून वाचण्यासाठी आव्हान करत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles