बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू, भाजपा तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांनी घेतली कुटुंबाची भेट…
पारनेर /प्रतिनिधी -पारनेर तालुक्यातील खडकवाडीतील रोकडे वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता ३ रीत शिकणारी कु. ईश्वरी पांडुरंग रोहकले हिचाराहत्या घरी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. कु. ईश्वरी सदैव हसतमुख असणारी गुणी व हुशार मुलगी होती. तिच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, अजून भाजप तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांनी कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी त्यांनी याबाबत सरकाराकडे पाठपुरावा पुरावा करून 25 लाख रुपये मदत मिळवुन देणार असल्याचे सांगितले. तसेच अनेक दिवसांपासुन पारनेर तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. तक्रार करुनही वन खाते मात्र निद्रिस्त अवस्थेत आहे, याचे दुःख व्यक्त केले.
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे. टाकळी ढोकेश्वर चे माजी सरपंच शिवाजी खिलारी , वडनेर गावचे सरपंच लहू भालेकर, भाजपचे नेते सचिन शेळके आदीं उपस्थित होते