किळसवाणा प्रकार… टोमॅटोसह इतर भाज्या धुण्यासाठी गटारीचे पाणी…व्हिडिओ

0
34

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा भाजीविक्रेता त्या नाल्यात टोमॅटो, मिरच्या आणि इतर अनेक भाज्या टाकून त्याची साफसफाई करताना दिसतो. आधी हा भाजीविक्रेता टोमॅटो आणि कोबी त्या नाल्यातील घाण पाण्याने धुवून उरलेल्या भाज्यांसह हातगाडीवर टाकतो. या नाल्यात हिरवी मिरची, कोबी आणि इतर अनेक प्रकारच्या भाज्याही आहेत. ही घटना महाराष्ट्रातील भिवंडी येथील आहे. या प्रकरणी आरोपी व्यक्तीविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.