Tomato Farming टोमॅटो सध्या १२०-२०० रुपये किलो दराने विकले जात आहेत. शहरांनुसार टोमॅटोचे दर वेगवेगळे आहेत. कर्नाटकमधील कोलार येथील एका शेतकरी कुटुंबाने एका दिवसात थोडेथोडके नव्हे तर तब्बल ३८ लाख रुपयांचे टोमॅटो विकले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी (११ जुलै) प्रभाकर गुप्ता व त्यांच्या भावांना टोमॅटोच्या २ हजार पेट्या ३८ लाख रुपयांमध्ये विकल्या. प्रभाकर गुप्ता आणि त्यांचे भाऊ ४० वर्षांपासून शेती करत आहेत. बेथमंगलामध्ये त्यांचे ४० एकर शेत आहे. “आम्ही चांगल्या दर्जाचे टोमॅटो पिकवतो. खतं आणि कीटकनाशकांबद्दल असलेल्या ज्ञानामुळे आम्हाला पीक कीटकांपासून सुरक्षित ठेवता येतं,” असं प्रभाकरचे चुलत भाऊ सुरेश गुप्ता म्हणाले.