उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या लंका भागातील हा व्हिडीओ आहे. इथल्या एका भाजी विक्रेत्याने टोमॅटोचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी दोन बाऊन्सर तैनात केले आहेत. अजय फौजी असं या विक्रेत्याचं नाव असून तो समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याने टोमॅटोचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी बाऊन्सर तैनात करण्याच्या त्याच्या कल्पनेची जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान अजय फौजी यांनी मागील आठवड्यात सपाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त टोमॅटोच्या आकाराचा केक कापला आणि लोकांना टोमॅटो वाटले होते.
भाजपा टमाटर को ‘Z PLUS’ सुरक्षा दे. pic.twitter.com/k1oGc3T5LN
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) July 9, 2023