गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिलेनं एक वाटी घेतली आहे. त्यामध्ये आधी वॅसलीन आणि नंतर टूथपेस्ट टाकून मिक्स करुन घेतलं आहे. याची आता एक पेस्ट तयार झाली आहे. आता तुम्ही म्हणाल या पेस्टचा उपयोग काय? तर याचे भरपूर उपयोग आहेत. जेव्हा आपल्याला डास चावतो तेव्हा लाल पुरळ येते. यावेळी ही पेस्ट लावू शकतो. तसेच जेवण करताना अनेकदा चटका लागतो तेव्हा ही पेस्ट तुम्ही लावू शकता. एवढचं नाहीतर या पेस्टनं तुम्ही घरातील वस्तूंचं क्लिनींगही करु शकता. बाथरुनमधले आरसे किंवा आरसा ही पेस्ट लावून तुम्ही स्वच्छ करु शकता. असं या गृहिणीने सांगितलं आहे.
वॅसलिनमध्ये टूथपेस्ट मिक्स करून बनवा पेस्ट…चमत्कारिक फायदे …व्हिडिओ
- Advertisement -