वाढत्या वाहनांमुळे पायी चालत रस्ता ओलांडणं देखील कठीण होऊन बसलं आहे. पण तुम्हाला तर माहीत आहेच की, भारतात जुगाडू लोकांची संख्या कमी नाही. तर याद्वारे ते कठिणातलं कठीण काम देखील अगदी काही वेळात करुन टाकतात, असाच एक रस्ता ओलांडतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लोक ट्रॅफिक सिग्नल लाल होण्याची वाट पाहतात. पण या व्यक्तीने आपल्या डोक्याचा वापर केला आणि एक शानदार शक्कल लढवली. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, ती व्यक्ती शांतपणे रस्त्याच्या कडेला गुडघ्यावर बसते आणि मग रेंगाळत रस्ता ओलांडू लागते. या व्यक्तीला पाहून लोकांना वाटतं की त्याला चालता येत नसावं. आता या व्यक्तीला असं पाहून लोकांना त्याच्यावर दया आली आणि सर्वांनी आपली गाडी थांबवली. एका व्यक्तीने तर आपल्या कारमधून बाहेर येत सर्व गाड्या थांबवल्या आणि या माणसाची रस्ता ओलांडण्यात मदत केली.