अहमदनगर : अहमदनगरच्य जामखेडमधून दुर्देवी घटना समोर आली आहे. जामखेडमध्ये नवविवाहित तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली. अवघ्या २२ वर्षांच्या सूरज महादेव मिसाळच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. सूरजचे मेडिकलचे दुकाने होते.मिळालेल्या माहितीनुसार, जामखेडमधील २२ वर्षीय तरुण सूरज महादेव मिसाळचं हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सूरजचे शुक्रवारी सायंकाळी निधन झालं. जामखेड तालुक्यातील साकत या खेडेगावात नवविवाहित तरुण राहत होता. सूरज हा बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मामाबरोबर मेडिकल दुकान चालवत होता.
सूरज शुक्रवारी सायंकाळी मेडिकलकधून आल्यावर त्याच्या छातीत दु:खू लागलं. त्यानंतर सूरजला तातडीने जामखेड येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. सूरजला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करुण मृत घोषित केले.सूरजचं २ मे रोजी लग्न झालं होतं. लग्नाला वीस दिवसही झाले नसताना सूरज आजारी पडला. त्याला बीडमधील दवाखान्यात दाखल करण्याल आलं. त्याच्यावर काही दिवस उपाचार सुरु होते. बरे वाटल्याने पुन्हा घरी आला.
सूरज घरी येऊन कामावर रुजू झाला. त्यानंतर सायंकाळी घरी आल्यावर छातीत दुखू लागलं. त्यामुळे सूरजला पुन्हा रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सूरजला मृत घोषित केले. आज सकाळी सात वाजता हनुमान वस्ती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सूरजच्या अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.