रेल्वे असलेल्या शहरांमध्ये रेल्वे फाटक देखील असतं. रस्त्याच्या मधोमध हे फाटक असतात. येथून ट्रेन येताना जाताना विशेष काळजी घेतली जाते. इन्लेक्ट्रीक पद्धतीने ट्रेन येण्याच्या काही वेळ आधीच हे फाटक बंद होते. त्यामुळे दोन्ही बाजूकडील नागरिक तेथून दूर उभे राहतात. आता सोशल मीडियावर याच फटकांमधील एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहून हे फक्त भारतात होऊ शकतं असं तुम्ही देखील म्हणाल. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक ट्रेन येणार असते. त्यामुळे फाटकाचे दरवाजे बंद होतात. यामुळे दोन्ही बाजूकडील फाटकाच्या दरवाजाजवळ थांबतात. मात्र एक व्यक्ती फाटक ओलांडून रेल्वे रुळांच्या शेजारी जाऊन थांबतो. फाटक ओलांडल्यास येणारी रेल्वे जर जलद वेगात असेल तर त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.