Sunday, September 15, 2024

IAS Transfer : राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या काही दिवसांपूर्वी बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर, आता राज्यातील अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, सोलापूरच्या जिल्हा परिषद मुख्याधिकारी मनीषा आव्हाळे यांची पुण्यात बदली करण्यात आली आहे. त्यांना त्यांच्या पुण्यातील पदभारसह बदली करण्यात आल्याचे पत्रही सामान्य प्रशासन विभागाकडून प्राप्त झालं आहे. त्यामुळे, आता लवकरच पुण्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारतील. दरम्यान, त्यांच्यासह अभिनव गोयल, विनायक महामुनी, सतीशकुमार खडके, सौम्या चांडक, कुलदीप जंगम आणि प्रदीपकुमार डांगे यांचीही बदली करण्यात आली आहे.

2 विनायक महामुनी यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर या पदावर करण्यात आलीय.

3 सतीशकुमार खडके यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बीड या पदावर करण्यात आली आहे.

4 सौम्या शर्मा चांडक मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी,स्मार्ट सिटी नागपूर या पदावर करण्यात आली आहे.

5 मनीषा आव्हाळे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी, पुणे या पदावर करण्यात आली आहे.

6 कुलदीप जंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर या पदावर करण्यात आलीय.

7 प्रदीप कुमार डांगे यांची नियुक्ती आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नवी मुंबई या पदावर करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles