Thursday, July 25, 2024

सुजित झावरे पाटील यांच्या प्रयत्नातून, देवकृपा फाऊंडेशनच्या माध्यमातुन वृक्ष लागवड हा उत्सव

वृक्ष लागवड हा उत्सव व्हावा – सुजित झावरे पाटील

सुजित झावरे पाटील यांच्या प्रयत्नातून तसेच देवकृपा फाऊंडेशन च्या माध्यमातुन राबविण्यात आलेल्या “वृक्ष लागवड” या उपक्रमाची सुरुवात आज वासुंदे गावापासून करण्यात आली. यावेळी पारनेर तालुक्यातील प्रत्येक गावात युवक वर्गानी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या गावसाठी योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले तसेच पारनेर तालुक्यातील सर्व गावामध्ये १५,००० पेक्षा जास्त वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.
सदर उपक्रमात आवळा, बोखर, कडीपता, कडुलिंब, चिंच, आंबा, अर्जुन, जाभंळ, वड, शिसु, कांचन, पिंपळ या वनऔषधी वनस्पतीचा वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
यावेळी वृक्षारोपन करताना सुजित झावरे पाटील समवेत रणजित पाटील, शरद काका पाटील, भाऊसाहेब सैद, उपसरपंच शंकर बर्वे, चेअरमन नारायण झावरे व्हा चेअरमन रा. बा. झावरे, दिलिप पाटोळे, बाळासाहेब झावरे, पोपटराव झावरे, लहानभाऊ झावरे, पोपटराव हिंगडे, शांताराम झावरे, विलास हिंगडे, लक्ष्मण झावरे, स्वप्निल झावरे, डॉ प्रसाद झावरे, दत्तात्रय बर्वे, रामचंद झावरे, पोपटराव बर्वे, अमर भालके, निखिल दाते, शंकर झावरे, गणेश झावरे, मनोज झावरे, संग्राम झावरे, मारूती उगले सर, अमोल पोटघन, विकास झावरे, सुरेश शिंदे, बाळासाहेब झावरे, अशोक झावरे, साधना जगदाळे, उज्वला हिंगडे, शिवाजी गायके, मच्छिंद्र झावरे, अशोक बर्वे, पंढरीनाथ हिंगडे, पत्रकार गणेश जगदाळे तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या उपक्रमात उपस्थितीत होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles