२५ वर्षांपासून ट्रकचालक असणारे राजेश रवानी आज प्रसिद्ध यूट्यूबर आहेत. ट्रकचालक म्हणून भारताच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या राजेश यांना त्यांच्या स्वयंपाकाच्या प्रेमामुळे ‘R Rajesh Vlogs’ या नावाचे YouTube चॅनल सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.
झारखंडच्या जामतारा येथे राहणारे राजेश (Truck Driver Turned YouTuber) आता एक प्रसिद्ध यूट्यूबर असून त्यांचे यूट्यूबवर १.८८ हून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. त्यांच्या या अपार कष्टातून त्यांनी एक नवं घरदेखील घेतलं आहे. अलीकडेच सिद्धार्थ कन्नन यांच्या पॉडकास्टमध्ये राजेश रवानी यांनी हजेरी लावली होती. यादरम्यान राजेश यांनी त्यांच्या कमाईबद्दल आणि त्यांच्या नव्या घराबद्दल सांगितले.
ट्रक चालविण्याच्या () कामातून ते दरमहा २५ ते ३० हजार रुपये कमावतात, असे राजेश रवानी यांनी उघड केले. तर आता त्यांचे YouTube चॅनेल हे त्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत बनले आहे, जिथे त्यांनी दरमहा ४-५ लाख रुपये कमावले आहेत; तर अनेकदा त्यांनी १० लाखदेखील कमावले आहेत.