अहमदनगर शहरात ट्रक चालकांचा संप चिघळला
वाहनांवर हल्ला ; आंदोलनकर्त्यांवर तोफखाना पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
अहमदनगर ड्रायव्हर युनियन संघटनेच्या वतीने केंद्र शासनाचा हिट अँड रन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर शहरातील पोटला परिसरामध्ये आंदोलन सुरू होते. परंतु आंदोलनकर्त्यांनी सुरू असलेल्या वाहनांवर आंदोलनकर्त्यांनी हल्ला केला. सदरची घटना समजतात तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले आंदोलनकर्त्यांवर त्यांनी सौम्य लाठी चार्ज केला. तर काही आंदोलन करताना त्यांनी ताब्यात घेतले आहे. आंदोलनाची प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती. आज बुधवारी कोठला परिसरामध्ये सकाळच्या सुमारास ही घटना घडली
दरम्यान गुरुवारी सकाळी आंदोलन कर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सुरु असलेल्या वाहनांवर हल्ला करत वाहन चालकांच्या तोंडाला काळे फासले. तसेच चालकांच्या गळ्यात चपलांचे हार घालण्यात आले. वाहनांच्या काचाला काळे फासले, वाहनाच्या हवा सोडण्यात आल्या. दरम्यान घटनेची माहिती समजताच तोफखाना, कोतवाली, भिंगार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. केंद्राच्या हिट अँड रन या कायद्यामुळे ड्रायव्हर समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ड्रायव्हर गाडी चालवण्यास तयार नसून ड्रायव्हरवर उपासमारीची वेळ आली असून केंद्राचा हिट अँड रन कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी ड्रायव्हर संघटनांकडून होत आहे.