राज्यात चाललंय काय ? आणखी एका सरपंचावर हल्ला, जिवंत जाळण्याचा प्रयत्न

0
30

बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याकांड संपूर्ण राज्यात चर्चिलं जात असतानाच तुळजापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव निकम हे तुळजापूर येथील मिसाई जवळगाव या गावाचे सरपंच आहेत. त्यांच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा हल्ला सुद्धा पवनचक्कीच्या वादातून झाल्या असल्याची माहिती मिळत आहे

तुळजापूरच्या मेसाई जवळगावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला झालाय. सरपंच नामदेव निकम यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न कऱण्यात आला आहे. यामध्ये सरपंच नामदेव निकम आणि त्यांचा भाऊ जखमी झालाय. गाडीच्या काचा दगडाने फोडून पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न कऱण्यात आलाय. रात्री एक वाजता प्रकार घडलाय.पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे