सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती टोमॅटो खरेदी करत असून खिशातून १०० रुपये काढून भाजी विक्रेत्याला देत आहे, यानंतर तो त्याच्या तीन मित्रांसोबत हातात भाज्याच्या दोन पिशव्या घेऊन महागड्या टोमॅटोवर गाणं गात नाचताना दिसत आहे. त्याच्यासोबत त्याचे चार मित्रही नाचत आहेत. त्याच्या डान्स मूव्हमेंट आणि चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन अगदी पाहण्यासारख्या आहेत. यानंतर गाण्याच्या शेवटी तो व्यक्ती रिकाम्या खिशा दाखवत रडण्याचे एक्स्प्रेशन देत आहे. युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.
लाल टमाटर, महंगा टमाटर… टोमॅटोच्या वाढत्या किमतीवर मजेशीर गाणे; Video
- Advertisement -