TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरचे सर्वात नवीन आणि बेस व्हेरिएंट आहे. यामध्ये 2.2kWh ची बॅटरी आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरुम किंमत 94,999 रुपयांपासून सुरु होते. बजेटच्या हिशोबाने ही इलेक्ट्रिक स्कूटर अनेक खास फीचर्स आणि रेंजसह मिळते. नवीन इलेक्ट्रिक स्कूटर केवळ 2 तासात 0 ते 80 टक्के चार्ज होते. याशिवाय नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची सर्वाधिक गती ताशी 75 किमी आहे. यामध्ये 5 इंचाची कलर TFT स्क्रीन देण्यात आली आहे. याशिवाय या व्हेईकल क्रॅश, टो अलर्ट, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 30 लिटर स्टोरेज देण्यात आले आहे.TVS आयक्यूब 2.2kWh मॉडल दोन रंगात उपलब्ध आहे. यामध्ये वालनट ब्राऊन आणि पर्ल व्हाईट हे दोन रंग उपलब्ध आहेत. हे कंपनीचे सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे.
- Advertisement -