पारनेर तालुक्यातील तीन पूल गेले वाहून
तेल शेती, गुरुमाळ, जामगाव जुना रस्ता ,पांढरी वस्ती कडे जाणारे दोन पूल गेले वाहुन
मागील दोन दिवसापासून गोरेगाव व गोरेगाव परिसरातील गावामध्ये पावसाने जोर धरला असून काल रात्री गोरेगाव परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला . सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने पहिले पिके हातातून गेली होती. पाऊस नसल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त दिसत होता. गणपती बाप्पा आपल्या सोबत दमदार पाऊस घेऊन आल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंद चे वातावरण निर्माण झाले आहे. गोरेगावला वरदान असलेले एक नंबरचे तलाव व परिसरातील इतर तलाव तुडुब भरले गेले असून आहे. डिकसळ, करंदी, हिवरे कोरडा, पाडळी परिसरात ही मुसळधार पाऊस झाला आहे.
काल रात्री गोरेगांव व परिसरतील डिकसळ , ब्राह्मणदरा ,ढवळदरा ,शेरकर वस्ती, काळपट्टी ,खडक वस्ती, तलाव खालील क्षेत्र, सुतकडा वस्ती, गोरेगाव गावठाण व परिसरातील क्षेत्र येथे जोरदार पाऊस झाला व
श्री क्षेत्र संगम येथे दोन्ही नद्या एकत्र येतात, त्या आधी असलेल्या तेल नदीवरील गुरुमळ ,तेली शेत, जामगाव जुना रस्ता येथील पुल तसेच कापरी नदी वरील पांढरी वस्ती पुल, संगमेश्वर देवस्थानाला जाणारा पुलामध्ये ही पाणी बसले नाही म्हणून पूल उखडला गेला आहे, तीनिही ठिकाणी चे पुलामध्ये पाणी बसले नसल्याने रस्ता फुटून वाहून गेला यामुळे तेथील दोन्हीं पूल पाण्याच्या वेगाने वाहून गेले आहे आहेत.
तेल शेती ,गुरुमाळ, जामगाव जुना रस्ता या भागतील संपर्क तुटला गेला आहे. पूल वाहून गेल्याने तेली शेती, गुरुमाळ जामगाव जुना रस्ता येथील रामदास चौरे, सचिन रामदास तांबे, नामदेव नरसाळे, शरद नरसाळे,तुकाराम नरसाळे,हर्षल शेळके, देवराम चौरे, चिम भाऊ नरसाळे मेजर, अंबादास तांबे,बाबू नरसाळे व इतर शेतकरी व विद्यार्थी यांचे गोरेगांव ला संपर्क होणारे दोन्हीं पुल वाहून गेलेने दळण वळण होणार नसल्याने चिंता ग्रस्त आहेत.
भाळवणी गोरेगांव रस्ता चे काम अनेक दिवसापासून सुरू सुरू असून रस्त्याच्या साईड पट्ट्या भरताना बाजूच्या चारी बुजल्या गेल्या आहेत, तसेच मोढा वस्ती पाटील मळा येथे साईड ने चारी न काढल्या मुळे पावसाचे पाणी स्थानिक लोकांच्या घरात, शेतात, गोठ्यात शिरत आहे. त्यामूळे नवीन चालू असलेला रस्ता खराब होत आहे व उखडत आहे. संबधित ठेकेदाराने मनमानी न करता तातडीने चारी खोदून पाणी काढून द्यावे अशी मागणी स्थानिक लोकांनी केली आहे.
याबाबत गोरेगांव चे लोकनियुक्त सरपंच सौ.सुमनताई तांबे,उपसरपंच श्री अण्णा पाटील नरसाळे , माजी उपसरंच दादाभाऊ नरसाळे, ग्रापंचायत सदस्य श्री अनिल पाटिल , गणेश तांबे, विकास काकडे, सुरेश चौरे, साहेबराव नरसाळे, युवराज नरसाळे व ग्रामस्थांनी पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली.
“गोरेगाव परिसरात जोरदार पाऊस झाला असून पाण्याचा वेग कमी होताच दोन्हीं पुलाचे दुरुस्ती चे काम मा श्री बाबासाहेब तांबे यांचे मार्ग मार्गदर्शनाखाली तातडीने त्वरित पुर्ण केले जाईल. गोरेगांव उपसरपंच- श्री अण्णा पाटील नरसाळे”