संगमनेर : संगमनेरातील प्रवरा नदीच्या पात्रात बुडून दोघांचा मृत्यू झाला, ही घटना शुक्रवारी (दि.२४) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास गंगामाई घाट परिसरात घडली. बुडालेल्या दोघांनाही पोहणाऱ्या स्थानिक तरुणांनी बाहेर काढले. परंतू, त्यापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला.
आदित्य रामनाथ मोरे ( वय १७, रा. बालाजी नगर, घुलेवाडी, ता. संगमनेर) श्रीपाद सुरेश काळे ( वय १८, रा. कोळवाडे, ता. संगमनेर) अशी मयत मुलांची नावे आहेत. हे दोघेही विद्यार्थी असून ते कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होते. गंगामाई घाट परिसरात ते आंघोळ करण्यासाठी आले होते. नदीपात्रात विहीर असून तेथे मोठा खड्डा आहे. तेथे ते दोघेही बुडाले. काही वेळानंतर दोघांनाही पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने जवळच्या घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करत त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी हे घटनास्थळी पोहोचले.
_
दोघेही कनिष्ठ महाविद्यालयीन युवक होते. ते नदीपात्रात बुडाले असल्याची माहिती समजताच त्यांच्या मित्रांनी, कुटुंबीयांनी, नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती.
संगमनेरातील प्रवरा नदीच्या पात्रात बुडून दोघा महाविद्यालयीन मृत्यू
- Advertisement -