Tuesday, February 18, 2025

पांढरीपुलावर दोन बांधकाम मजूर ट्रकवर आदळून जागीच ठार

नगर -बांधकाम प्रशिक्षण शिबिराचा शेवटचा दिवस अटोपून गावी बेलपिंपळगावकडे (ता. नेवासे) मोटारसायकलवर येत असलेल्या दोन बांधकाम मजूर ट्रकवर आदळून जागीच ठार झाले. बहुचर्चित ठरत असलेल्या पांढरीपूल परिसरात आज दुपारी हा अपघात झाल्याने येथील अपघाताची मालिका कायम आहे.

शुक्रवारी (ता.१३) मध्यरात्री १२.३० ते शनिवारी (ता.१४) पहाटेच्या चार तासांत चार अपघात होण्याची घटना ताजी असताना आज पुन्हा पांढरीपूल-घोडेगाव रस्त्यावरील हॉटेल डिगंबर समोर उभ्या असलेल्या ट्रकवर मोटारसायकल आदळून ज्ञानेश्वर नाथा हिरडे (वय-४०) व सुभाष आसाराम गारुळे (वय ४५ दोघे रा. बेलपिंपळगाव) हे दोघे ठार झाले.

अपघातानंतर दोन ते तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. सहायक पोलिस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी रामदास तमनर, महेंद्र पवार यांनी वाहतूक सुरळीत केली. पांढरीपूल ते इमामपूर घाट परिसरात आठ दिवसांत सात अपघात होवून तीन ठार व तेरा जण जखमी झाले आहेत.
वांजोळी ग्रामस्थ व पांढरीपूल व्यावसायिकांनी अपघात टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी, याकरीता अनेकदा निवेदन व रास्तारोको आंदोलने करुन उपयोग झालेला नसल्याने बेलपिंपळगावचे सरपंच चंद्रशेखर गटकळ यांनी मृत व्यक्ती धीरडे व गारुळे यांना न्याय देण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles