Tuesday, June 25, 2024

जामखेड बटेवाडी शिवारात एसटी बस- कारचा भीषण अपघात दोघाचा मृत्यू ,तर तीन गंभीर जखमी

जामखेड बटेवाडी शिवारात भीषण अपघात दोघाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी

जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )
जामखेड पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जामखेड खर्डा रोडवर बटेवाडी शिवारात, कोल्हे पेट्रोल पंप जवळ, ता जामखेड येथे जामखेड कडून खर्डा कडे जाणारी एस टी बस क्रमांक MH 09 FL 1027 (कोपरगाव ते हैदराबाद) (चालक सचिन विष्णू राऊत, वय 38 वर्षे, बॅच न 8551, कोपरगाव आगार ) या बसचा आणि खर्डा कडून जामखेड कडे येणारी Cherolet शेरोलेट बीट कार क्रमांक MH 16 AT 6492 या वाहनांमध्ये अपघात झालेला आहे. दोन मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

सदर अपघातात शेरोलेट कार मधील 5 जण होते जखमी झालेले आहेत त्यापैकी 3 गंभीर जखमी असल्याने त्यांचेवर पन्हाळकर हॉस्पिटल मध्ये प्राथमिक उपचार करून नगर येथे सिव्हिल हॉस्पिटल ला पाठविलेले होते. त्यापैकी 2 मृत्यू झालेले आहेत.

यामध्ये विजय गंगाधर गव्हाणे, वय 24वर्षे, पंकज सुरेश तांबे, वय 24 वर्षे हे मयत झाले असून यात मयूर संतोष कोळी, वय 18 वर्षे हे गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना समर्थ हॉस्पिटल, जामखेड येथे उपचाराकरिता दाखल करून पुढील उपचारासाठी साईदीप हॉस्पिटल, अहमदनगर येथे गेलेले

अपघातात पुढील तीन जण गंभीर जखमी आहेत.
मयूर संतोष कोळी, वय 18 वर्षे, सचिन दिलीप गीते, वय 30, अमोल बबन डोंगरे, वय 28
सर्व रा ठी – वडगाव गुप्ता, MIDC, नगर
मयत इसम यांचे इंटरेस्ट पंचनामे करण्यासाठी पोलीस हवालदार कदम व इंगळे यांना रवाना करण्यात आलेले आहे.

एसटी चालक यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे
पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग श्री वाखारे साहेब, जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक गौतम तायडे यांनी भेट दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles