Friday, February 7, 2025

अहमदनगरमध्ये खळबळ स्वाईन फ्ल्यू आजाराने दोघांचा मृत्यू !

अहमदनगर – गणोरे व पाडाळणे येथील दोन रुग्णांचा स्वाईन फ्लू आजाराने मृत्यू झाला आहे. दरम्यान, राजूर येथील एका स्वाईन फ्लू रुग्णावर संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तालुक्यामध्ये डेंग्यूचे 7, चिकन गुनिया 2 तर काही स्वाईन फ्लू सदृश रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. अकोले शहरातील अनेक खासगी दवाखाने व शासकीय रुग्णालयांत डेंग्यू , चिकन गुनिया तर काही ठिकाणी स्वाईन फ्लू सदृश रुग्ण उपचार घेत असल्याचे समजते.

या आजारांना नेमके जबाबदार कोण, नागरिक, नगरपंचायत की ग्रामपंचायत प्रशासन, असा प्रश्न सध्या आरोग्य विभागासाठी संशोधनाचा ठरत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागासह राजूर अकोले शहरात मुख्य चौकांसह भरवस्तीतील अस्वच्छता, साठलेले डबके व कचराप्रश्नी सर्वस्वी नागरिकच जबाबदार असले तरी तोकडी यंत्रणाही तितकीच जबाबदार ठरत आहे. यामुळे सध्या ग्रामीण भागासह शहरात डासांच्या त्रासांच्या उपद्रवामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सर्व ठिकाणी नगरपंचायत व ग्रामपंचायत प्रशासनाकडून मलमपट्टी करताना अडचणी येत आहेत.

घरात कोणी आजारी पडले की, तात्पुरत्या होणार्‍या स्वच्छतेमध्ये सातत्य नसते. अस्वच्छता निर्माण होऊ नये, यासाठी यंत्रणा सतत कार्यरत राहणे गरजेचे आहे. दैनंदिन कचरा गाडी दारात येऊनदेखील रस्त्यावर कचरा फेकणारे काही नागरिक दोषी ठरत आहेत. स्वच्छता करणारी अकुशल तोकडी यंत्रणा व कचरा गाडीतील ओला-सुका कचरा विलगीकरणाची ओरड येथील आरोग्य बिघडवित असल्याचे वास्तव दिसत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles